महोगनी लागवडीचे सत्य 

शेतकरी मी

आजकाल शेतकर्‍यांमध्ये एक नवीन ट्रेंड चालू आहे, तो म्हणजे महोगनीची लागवड करणे आणि 10 वर्षांनी करोडपती होणे.

अनेक कंपन्या व त्यांचे एजंट शेतकऱ्यांना स्वप्न दाखवून कंपनीच्या वतीने करार करून एक एकरात २० ते ३० रुपये खर्चून महोगनी लागवड करून घेतात.

असे अनेक एजंटही आहेत, ज्यांनी स्वतःची रोपवाटिका बनवून कंपनीच्या नावावर महोगनीची छोटी अवैध रोपे विकली,

अनेक शेतकऱ्यांना माहीत आहे की, इम्मू पालन, कडकनाथ कोंबडी पालन अशा अनेक योजना बाजारात आल्या होत्या पण त्या सर्व कंपन्या पैसे घेऊन पळून गेल्या,

10 वर्षांनी कंपनी पळून गेली तर तुम्ही मोहगणीचे लाकूड स्वतः विकू शकाल अशी तयारी शेतकर्‍याला करण्याची गरज आहे

एक गोष्ट म्हणजे बाजारात लाकडाची किंमत आहे आणि तुम्ही कंपनीशिवाय स्वतः लाकूड तुमच्या  विकू शकता.

तुम्ही महोगनीची लागवड करू शकता पण करोडपतींसारख्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, आज कालच्या काळात माती पण विकल्या जाती हे तर मोलाचे लाकूड आहे 

बाजारामध्ये स्वतः पूर्ण अभ्यास केल्या शिवाय कोणते हि कार्य शेतकऱ्यांनी टाळावे आणि स्वताच्या जोखमीवर  निर्णय घ्यावा