शेतकरी मी
येत्या ५ ते ६ दिवसात मुंबई, मराठवाडासह मध्य महाराष्ट्रात, विदर्भात विविध भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी हि आनंदाची बातमी असून खरीप हंगामासाठी पाऊसाची आतुरतेने वाट पाहत होते
गेल्या २४ तासात कोकण गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला .मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे २3जून ते २7 जून या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे
गोवा व दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर 23जुन ते 27 जून मध्ये सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे .बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे .
विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल तर काही ठिकाणी मेघगर्जना तसेच विजेच्या कडकडाटासह जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे
मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.